महाराष्ट्रात ४ वर्षांत भटकी कुत्री चावून १०० जणांचा मृत्यू !

कुत्र्यांनी २५ लाख लोकांचा घेतला चावा !

मुंबई – जानेवारी २०१९ ते ३० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत राज्यात २५ लाख व्यक्तींना भटकी कुत्री चावली असून अशा व्यक्तींपैकी १०० जण दगावले आहेत. या वर्षातील पहिल्या १० महिन्यांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरांत आणि ग्रामीण भागांत अशी दोन्ही ठिकाणी भटक्या कुत्र्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संकेतस्थळावर हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे, तसेच त्यांची पैदास वाढू नये, यासाठी प्रयत्न करण्याचे प्रयत्न होत असले, तरी ते पुष्कळ अपुरे आहेत, हेच यावरून लक्षात येत आहे. एकंदर आकडेवारीनुसार महिलांपेक्षा पुरुषांना कुत्री चावून पुरुष दगावण्याचे प्रमाण अधिक आहे.

श्‍वानदंशाची वर्ष २०१९ पासूनची आकडेवारी

संपादकीय भूमिका 

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू न शकणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !