नवी मुंबई – बी.ए.एन् एम्. आणि सी.आर्.इ.डी.ए.आय. यांच्या वतीने वाशी येथे भरवण्यात आलेल्या ‘२२ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. १ ते ४ डिसेंबर या कालावधीत सिडको प्रदर्शन केंद्र येथे हे प्रॉपर्टी एक्झिबिशन भरवण्यात आले आहे.
या ग्रंथप्रदर्शनाला भेट देणारे बांधकाम आणि विविध क्षेत्रांतील व्यावसायिक यांच्यासह विविध मान्यवर अन् जिज्ञासू यांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेतली. अनेकांनी या वेळी साधना, वास्तूशुद्धी आदी विषयांवर शंकानिरसन करून घेतले, तसेच दैनंदिन जीवनात धर्माचरण आणि साधना यांसाठी करावयाचे प्रयत्न याची माहिती जिज्ञासूंनी समजून घेतली.
सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांची भेट !पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. त्या वेळी सनातन संस्थेच्या श्रीमती स्मिता नवलकर यांनी त्यांचा सत्कार केला. |