हत्या करून निर्जनस्थळी मृतदेह पुरला !

पुणे – जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून ४ दिवसांची पोलीस कोठडी इंदापूर न्यायालयाने सुनावली आहे. गणेश शिंदे, मच्छिंद्र शिंदे, आकाश शिंदे अशी आरोपींची नावे असून वैभव पारेकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मृताचे वडील शिवाजी पारेकर यांनी इंदापूर पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना कह्यात घेतले आहे. आरोपींनी हत्या करून निर्जनस्थळी मृतदेह पूरल्याचे सांगितले.
ज्या दिवशी आरोपी वैभवला आपल्यासमवेत घेऊन गेले, त्याच दिवशी त्यांनी बेडशिंगे गावच्या परिसरात धारदार हत्याराने वार करून त्याची हत्या केली होती. त्याचा मृतदेह चारचाकीच्या ‘डिक्की’त रात्रभर ठेवला. त्यानंतर डोंगरदर्यातील माळावर खड्ड्यात त्यांनी वैभवचा मृतदेह पुरला.
संपादकीय भूमिकादिवसेंदिवस समाजाची नैतिकता खालावत चालल्याचे उदाहरण ! नैतिकता टिकून रहाण्यासाठी जनतेला धर्मशिक्षण देणेच आवश्यक ! |
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !