चोपडा (जिल्हा जळगाव) येथे धर्मांध गोतस्करांकडून पोलिसांवर आक्रमण !

७ जण पोलिसांच्या कह्यात !

जळगाव – शहर पोलीस अवैध गुरांची वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करतात, याचा राग आल्याने धर्मांध गोस्तकरांनी गस्तीवर जाणार्‍या पोलिसांना अडवून त्यांच्यावर आक्रमण केले. ही घटना चोपडा शहरात १ डिसेंबरला रात्री ११ वाजता घडली.

या आक्रमणात साहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे आणि हवालदार संतोष पारधी हे गंभीर घायाळ झाले. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून ७ जणांना कह्यात घेण्यात आले आहे.

अवैधरित्या गोवंशियांची वाहतूक करणार्‍यांवर पोलीस कारवाई करतात; म्हणून साने गुरुजी वसाहत येथील सलीम कुरेशीसह १० ते १२ जण पोलीस ठाण्यावर चालून आले. पोलिसांनी त्यांना तिथून हाकलून लावल्यानंतर त्यांनी यावल रोडवरील नगरपालिकेच्या पशूवधगृहाजवळ जमाव जमवत गस्तीवर जात असलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे, हवालदार संतोष पारधी यांना रस्त्यात अडवून मारहाण केली, तसेच जिवे मारण्याची चेतावणी दिली.

संपादकीय भूमिका

  • कायद्याचा धाक नसलेले धर्मांध !
  • गोवंशहत्या बंदीचा कायदा असूनही पोलीस प्रशासन कठोरात कठोर कारवाई करून राज्यातील गोहत्या, गोतस्करी आदी बंद करण्यात अयशस्वी ठरले आहेत ! दबाव आणि भ्रष्टाचार ही याची कारणे आहेत. आता हेच धर्मांध पोलिसांच्या जिवावर उठले आहेत ! आता तरी पोलीस गोतस्करांचा कायमचा बंदोबस्त करण्यास पुढाकार घेणार का ?