छत्रपती संभाजीनगर – वडिलोपार्जित भूमीची वाटणी करून देण्यासाठी १८ सहस्र रुपयांची लाच घेणारे तलाठी संजय विसपुते आणि त्यांचे साहाय्यक गजानन सोमासे, तर कन्नड येथे शासकीय अनुदान तत्त्वावर मिळालेल्या मृत शेळ्यांच्या विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून २ सहस्र रुपयांची लाच मागणारे पशूधन विकास अधिकारी डॉ. अरुण गवारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
आमठाणा येथील तक्रारदार शेतकर्याची वडिलोपार्जित शेतभूमीचे वाटणीपत्र करून त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी तलाठी आणि साहाय्यक यांनी शेतकर्याकडून २० सहस्र रुपयांची लाच मागितली.
१ डिसेंबर या दिवशी यातील १८ सहस्र रुपये तक्रारदाराकडून स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दोघांना पकडले. दोघांच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकासर्व शासकीय सुविधा आणि मुबलक वेतन असतांनाही हे अधिकारी लाच घेतात यावरून त्यांची स्वार्थी वृत्ती लक्षात येते. अशांना त्वरित कठोर शिक्षाच होणे आवश्यक ! |