मुंबई – अन्न आणि औषध प्रशासन विभागाने २० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत केलेल्या कारवाईत राज्यात २९ लाख ६६ सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी आदी पदार्थांचा समावेश आहे. राज्यात २२० ठिकाणी केलेल्या कारवाईत हे पदार्थ कह्यात घेण्यात आले. या प्रकरणी १८० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी २२२ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
१ एप्रिल ते २४ नोव्हेंबर या कालावधीत अन्न आणि औषध प्रशासनाने अमली पदार्थांची वाहतूक करणारी ९५ वाहने कह्यात घेतली, तसेच अशा पदार्थांची विक्री करणार्या ४१३ आस्थापनांना ‘सीलबंद’ केले. या सर्व कारवायांमध्ये १७ कोटी ६४ लाख ७४ सहस्र ६७४ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणांत ७०९ आरोपींना अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिका :सातत्याने लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त होणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! |