चंद्रपूर – ‘विमा मान्य होऊन २ वर्षे झाली; मात्र पैसे मिळाले नाहीत’, अशी तक्रार शेतकर्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली. तेव्हा ही अक्षम्य दिरंगाई पहाता वडेट्टीवार यांनी ३० नोव्हेंबर या दिवशी पीकविमा आस्थापनाचे कर्मचारी आणि अधिकारी यांना फैलावर घेत समज दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील हानीग्रस्त शेतकर्यांशी वडेट्टीवार यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी शेतात बसून शेतकर्यांकडून हानीची माहिती घेतली. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकर्यांना हानीभरपाई द्यावी, अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ, अशी चेतावणी त्यांनी राज्य सरकारला दिली.