पणजी : म्हादई प्रकरणातील खटल्यांची सुनावणी २९ आणि ३० नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. सर्वाेच्च न्यायालयात म्हादईशी संबंधित ५ वेगवेगळे खटले चालू आहेत. यामध्ये कर्नाटक वन्यजीव वॉर्डन विरुद्धचा खटलाही आहे. सर्वाेच्च न्यायालयाने सर्व प्रकरणे एकाच खटल्यात समाविष्ट केली आहेत. महाधिवक्ता आणि अधिवक्ते यांचा गट गेल्या अनेक दिवसांपासून म्हादई प्रकरणाचा गांभीर्याने आढावा घेत आहे.
ज्या पद्धतीने खटले प्रविष्ट झाले आहेत, त्यावरून गोवा हे खटले जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. ‘म्हादई प्रकरणी आम्ही गंभीर आणि भक्कम आहोत’, असेही ते म्हणाले.
कायदेशीर आणि तांत्रिक पथक उद्या देहलीला जाणार ! – महाधिवक्ता
आमचे कायदेशीर आणि तांत्रिक पथ उद्या देहलीला जाणार आहे. आमचे सल्लागार आणि आम्ही सर्वजण सिद्ध आहोत. न्यायालयात प्रकरण आल्यास युक्तीवाद करण्यास सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया महाधिवक्ता देवीदास पांगम यांनी दिली.
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦