Weather Update: देशभरात थंडी वाढणार

नवी देहली – देशात थंडीने दार ठोठावले आहे. २६ नोव्हेंबरला रात्रीपासून मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि तमिळनाडू इत्यादी राज्यांच्या अनेक भागात पाऊस पडला. त्यामुळे या राज्यांमध्ये थंडी अचानक वाढली आहे. राजस्थानमध्ये दिवसाचे तापमान ८ अंशांनी, तर देहलीत १० अंशांनी घसरले आहे. २७ नोव्हेंबर या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये तापमान शून्य अंशावर नोंदवले गेले. गुजरातच्या अनेक भागांत मुसळधार पावसासोबत गाराही पडल्या आहेत, तर वीज पडून २० जणांचा मृत्यू झाला आहे. येणार्‍या काही दिवसांत देशभरात थंडी वाढणार असल्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पूर्व महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पश्‍चिम उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर इत्यादी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हवामानातील पालटामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.