(म्हणे) ‘अयोध्येतील श्रीराममंदिरात जो हिंदु जाईल, तो मुसलमान म्हणून बाहेर येईल !’ – पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद

पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याचे हास्यास्पद विधान !

पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतात जे काही घडत आहे आणि ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तम काम केले आहे, ते त्यांच्यासाठी चांगले आहे; पण आमच्यासाठी नाही. मी खोलात जाऊन सांगतो की, एका मशिदीचे मंदिरात रूपांतर झाले आहे. माझा विश्‍वास आहे की, जो कुणी त्या मंदिरात जाईल, तो मुसलमान म्हणून बाहेर येईल; कारण आमची मुळे नेहमी त्याच्यातच असणार आहेत. जेथे आमच्या वडिलधार्‍यांनी इस्लामचा प्रसार केला आहे, तेथे तुम्ही बघितलेच असेल, त्या गोष्टी तेथून जन्म घेतात; पण लोकांना समजणार नाही. मला त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास आहे की, तेथून मुसलमान म्हणून बाहेर येतील, असे अयोध्येतील श्रीराममंदिराविषयी विधान असणारा पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याचा जुना व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. मियांदाद याने ८ ऑगस्ट २०२० या दिवशी श्रीराममंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात हा व्हिडिओ प्रसारित केला होता.

संपादकीय भूमिका

ज्या ठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आली होती, ती श्रीरामजन्मभूमी असून तेथे पूर्वी भव्य श्रीराममंदिर होते. यामुळे गेल्या ५०० वर्षांत बाबरीमध्ये जे मुसलमान गेले होते, ते हिंदूच होऊनच बाहेर आले असणार. इतकेच नाही, तर मुसलमानांनी साडेतीन लाख मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या. मंदिरांचे मूळ हिंदु असल्याने या ठिकाणी जाणारे सर्व मुसलमान हिंदूच झाले आहेत, असे हिंदूंनी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !