(म्हणे) ‘तुम्हाला (पोलिसांना) येथून जावे लागेल कि आम्ही तुम्हाला पळवू ?’ – अकबरुद्दीन ओवैसी

  • एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी भरसभेत पोलिसांना धमकावले !

  • पोलिसांकडून गुन्हा नोंद

एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी

भाग्यनगर (तेलंगाणा) – एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी भरसभेत पोलिसांना धमकावले. पोलिसांनी वेळेत सभा थांबवण्याची सूचना केल्याने ‘चाकू आणि गोळ्या यांचा सामना केल्यामुळे मी दुर्बल झालो आहे’, असे तुम्हाला वाटत आहे का ? माझ्यात अजूनही धाडस आहे. सभेची ५ मिनिटे अजून उरली आहेत, मी आणखी ५ मिनिटे बोलणार. कुणी मायेचा पूत जन्माला आलेला नाही, जो मला थांबवू शकेल’, अशा शब्दांत अकबरुद्दीन यांनी पोलिसांना दम दिला. ते येथे तेलंगाणात विधानसभा निवडणुकांचा प्रचारसभेत बोलत होते. अकबरुद्दीन ओवैसी चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून  निवडणूक लढवत आहेत. अकबरुद्दीन यांच्या या विधानानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

अकबरुद्दीन यांनी पुढे उपस्थितांना संबोधून विचारले, ‘मी बरोबर बोललो ना ? जर मी केवळ इशारा केला, तर तुम्हाला (पोलिसांना) येथून जावे लागेल कि आम्ही तुम्हाला पळवू ? आम्हाला दुर्बल करण्यासाठी हे लोक येथे येत असतात.’

संपादकीय भूमिका

  • १५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास १०० कोटी वाल्यांना दाखवून देऊ’ अशा प्रकारचे विधान करून निर्दोष सुटलेल्या अकरबरुद्दीन ओवैसी यांची मानसिकता कशी आहे ?, हे पुन्हा एकदा दिसून आली. आता तरी त्यांना शिक्षा होणार का ?
  • उठसूठ हिंदुत्वनिष्ठांवर कथित द्वेषमूलक विधाने केल्याच्या (‘हेट स्पीच’च्या) प्रकरणी गुन्हा नोंदवणारे पोलीस पोलिसांनाच धमकी देणार्‍या अकबरुद्दीन ओवैसी यांच्याविरुद्ध ‘हेट स्पीच’ अंतर्गत गुन्हा नोंदवणार का ?