‘आंचिम’मध्ये ६ सहस्र ५०० प्रतिनिधींची झाली नोंदणी
पणजी, १९ नोव्हेंबर (वार्ता.) : जगातील सर्वांत मोठ्या आणि सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (‘आंचिम’ला) पडदा इंग्लंडमधील चित्रपट ‘कॅचिंग डस्ट’च्या प्रदर्शनाने उघडणार आहे. ‘आंचिम’चा भव्य असा उद्घाटन सोहळा ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात २० नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि शाहिद कपूर यांच्या नृत्याचे खास आकर्षण असणार आहे. यंदा ‘आंचिम’मध्ये ६ सहस्र ५०० प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे.
IFFI presents the highly anticipated International Premiere of the Opening Film "Catching Dust" at the 54th International Film Festival of India in Goa!
Starring Erin Moriarty and Jai Courtney, the film explores the complexities of relationships in the American South. pic.twitter.com/YUDNY9IdAH
— International Film Festival of India (@IFFIGoa) November 8, 2023
‘आंचिम’ हा कान्स, बर्लिन आणि व्हेनिस यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या तोडीचा महोत्सव आहे. यंदा ‘आंचिम’मध्ये २७० पेक्षा अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय विभागात १९८ चित्रपट असतील. ५३ व्या ‘आंचिम’पेक्षा यंदा चित्रपटांची संख्या १८ ने अधिक आहे. ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात भारतातील २५ ‘फिचर फिल्म’ आणि २० अन्य चित्रपट (फिचर फिल्म नसलेले) दाखवले जाणार आहेत.
उद्घाटन समारंभाला दिग्गज कलाकार लावणार उपस्थिती‘आंचिम’च्या उद्घाटन समारंभाला शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, श्रिया सरम यांच्यासमवेतच ‘बॉलिवूड’चे दिग्गज कलाकार सलमान खान, सनी देओल, मधुर भांडारकर, के.के. मेनन, विजय सेतुपती, बोनी कपूर, गुलशन ग्रोवर, करण जोहर, अल्लू अर्जुन, कार्तिकी गॉसल्विस, तर मायकल डग्लस, ब्रिलटि मेंडोझा, ब्रेंडन गाल्विन हे विदेशी कलाकार उपस्थिती लावणार आहेत.
|
‘आंचिम’मध्ये महनीय व्यक्तींसाठी कडक सुरक्षा व्यवस्था
‘आंचिम’मध्ये सहभागी होणार्या महनीय व्यक्तींसाठी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे, तसेच महनीय व्यक्तींना देण्यात येणार्या खाद्यपदार्थांवरही देखरेख असणार आहे. गोवा सरकारचे अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी ‘आंचिम’मध्ये सहभागी देशी आणि विदेशी अतीमहनीय व्यक्तींना देण्यात येणारे खाद्यपदार्थ तपासण्यासाठी गट नेमणार आहे. ‘आंचिम’चा बांबोळी येथील उद्घाटन आणि समारोप सोहळा, तसेच गोवा मनोरंजन संस्थेच्या संकुलात होणार्या सर्व कार्यक्रमांच्या वेळी अन्न आणि औषध प्रशासनाचा चमू उपस्थित असणार आहे. महोत्सव काळात पोलीस यंत्रणाही सतर्क असणार आहे.
हे ही वाचा –
♦ 54th IFFI 2023 : चित्रपट नगरीसाठी गोवा मनोरंजन संस्था भूमी ‘लिज’वर घेणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
https://sanatanprabhat.org/marathi/738414.html