गोवर्धनपूजेचे महत्त्व !

बलीप्रतिपदेच्‍या दिवशी गोवर्धनपूजा करण्‍याची प्रथा आहे. भगवान श्रीकृष्‍णाद्वारे या दिवशी इंद्रपूजनाच्‍या ठिकाणी गोवर्धनपूजन आरंभ करण्‍यात आले. याच्‍या स्‍मरणार्थ या दिवशी गोवर्धन पूजन केले जाते. प्रात:काली घराच्‍या मुख्‍य दारासमोर गायीच्‍या शेणाने गोवर्धन पर्वत बनवतात. त्‍यावर दूर्वा आणि पुष्‍पे घालतात.

धर्मशास्‍त्रात सांगितले आहे की, या गोवर्धन पर्वताचे शिखर बनवावे. वृक्ष-शाखा आणि फुले यांनी त्‍याला सुशोभित करावे. याच्‍या समीप कृष्‍ण, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे सजवून त्‍यांचीही पूजा करतात आणि चित्ररथ काढतात; परंतु अनेक ठिकाणी हे मनुष्‍याच्‍या रूपात बनवतात आणि फूल इत्‍यादींनी सजवतात. चंदन, फूल इत्‍यादीने त्‍याचे पूजन करून प्रार्थना करतात.