नागपूर येथे महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये तस्करांकडून ४१.२३ किलो चांदी जप्त !

  • इतवारी रेल्वे स्थानकावर ‘आर्.पी.एफ्.’ पोलिसांची कारवाई !

  • २ आरोपींना अटक

नागपूर – नागपूरकडे येणार्‍या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये चांदीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच ‘आर्.पी.एफ्.’च्या (रेल्वे सुरक्षा दलाच्या) पोलिसांनी इतवारी रेल्वे स्थानकावर गाडीची पडताळणी करून ४१.२३ किलो चांदी जप्त केली. त्याची किंमत ९ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे.

सणासुदीचे दिवस आणि ५ राज्यांतील विधानसभा निवडणुका यांच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेचे पथक विशेष मोहीम राबवत आहे. ‘आर्.पी.एफ्.’च्या नागपूर विभागाचे पथक विशेष पडताळणी मोहीम राबवत आहे. स्थानकावर येणार्‍या रेल्वे गाड्या आणि प्रवासी यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. कुणी संशयित दिसल्यास त्याची तात्काळ चौकशी केली जात आहे. या अंतर्गत विविध रेल्वेगाड्या पडताळत असतांना वरील प्रकारची कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका

तस्करी करणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !