अमळनेरच्या धर्मांधाकडून कृत्य, अश्लील छायाचित्र काढून ‘ब्लॅकमेलिंग’ही केले !
पुणे – येथील एका तरुणीला हॉटेलवर नेऊन तिला गुंगी आणणारे औषध देऊन अमळनेर येथील वासनांध तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देहली येथील प्रजासत्ताकदिनाच्या परेडसाठी निवड झाल्यानंतर दोघांची ओळख झाली होती. त्याचा अपलाभ घेत साहिल खान नन्हेखान पठाण या २७ वर्षीय तरुणाने पिडीतेचे अश्लील छायाचित्र काढून तिला ब्लॅकमेल केले. त्याला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी सांगितले की, अमळनेर येथे स्टेशनरोडवर असलेल्या राम चौक परिसरात साहिल पठाण रहातो. पुण्याची पीडित तरुणी २२ वर्षांची असून, तिचाही साहिलसह प्रजासत्ताकदिनाच्या देहली येथील परेडसाठी महाराष्ट्रातून निवड झालेल्यांमध्ये समावेश होता. एकत्रित प्रशिक्षण घेत असतांना दोघांची ओळख झाली होती. त्याच ओळखीतून पठाण याने तिला पुण्यातील एन्.सी.सी. मुख्यालय येथे २१ डिसेंबर २०२२ या दिवशी बोलावून घेतले होते. गोड बोलून तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिला गुंगी आणणारे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याच वेळी त्याने तिचे अश्लील छायाचित्र काढले आणि चित्रफीतही बनवली. याच चित्रीकरणाच्या आधारे तो तिला ‘ब्लॅकमेल’ करत पुन्हा तिला त्रास देऊ लागला; मात्र तरुणीच्या घरी हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यामुळे गुन्हा नोंद करून त्याला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. (अशा गुन्हेगारांना शिक्षेचे भय नाही, असेच वारंवार घडणाऱ्या घटनांवरून लक्षात येते. महिलांचे उद्दाम धर्मांधांपासून रक्षण होण्यासाठी असा धर्मांधांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे – संपादक)