मुंबई – मुंबई विमानतळ प्राधिकरणाने २९ ऑक्टोबर २०२३ ते ३० मार्च २०२४ पर्यंत हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हिवाळी वेळापत्रकात ८ टक्के उड्डाणांची संख्या वाढणार आहे. प्रतिदिन ९७५ विमानांची उड्डाणे होतील. तसेच ११५ ठिकाणी नवीन विमान सेवा चालू करण्यात आली आहे.