रहिवासी क्षेत्रात ‘बियर बार’ला विरोध करणार्या नागिरकांचे अभिनंदन !
कणकवली – स्थानिक रहिवाशांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता समर्थनगर, नरडवे रोड येथे ‘बियरबार आणि परमिट रूम’ला (मद्यालयाला) अनुमती मिळाल्याचे समजते. येथे ‘परमिट रूम आणि बियरबार’ चालू करण्यास आमचा आक्षेप असून यासाठी दिलेली अनुमती रहित करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समर्थनगर येथे ५ इमारती असून अनेक बंगले आहेत. येथील वातावरण शांततापूर्ण असून सर्व सुशिक्षित लोकांची वस्ती आहे. येथून जवळ ‘पोदार इंग्लिश माध्यमाची शाळा’ आहे. मुलांचा येण्या-जाण्याचा मार्ग आणि बसथांबा आहे. तेथे परमिट रूमला अनुमती दिली, तर या परिसरात अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘परमिट रूम’ला अनुमती दिल्यास नागरिक तीव्र आंदोलन करतील, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
भाववाढ झाली असली, तरी ठेकेदारांनी कामे पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार !
‘वन्दे मातरम्’च्या इतिहासावर सहयोगी संपादक सिद्धराम पाटील यांचे १४ जूनला व्याख्यान !
अवैधरित्या मद्यविक्री करणार्याला असलदे ग्रामस्थांनी क्षमा मागायला भाग पाडले !