सोलापूर येथे गरब्याच्या कार्यक्रमात हिंदू म्हणून घुसलेल्या ३ मुसलमान तरुणांना हिंदु संघटनेचा दणका !

नाव लपवून कार्यक्रमात घुसलेले तरुण पोलिसांच्या कह्यात

प्रतिकात्मक चित्र

सोलापूर – येथील एम्.आय.डी.सी. भागातील पद्मावती सभागृह येथे गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. तेथे ३ मुसलमान तरुण स्वत:चे नाव लपवून हिंदु युवतींसमवेत गरबा खेळण्यासाठी आले होते. त्यांना येथील हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कह्यात दिले. गरब्याच्या सभागृहात हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थितांचे आधार कार्ड पडताळण्यास, तसेच प्रत्येकाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यास प्रारंभ केला. या ठिकाणी १ धर्मांध २ अल्पवयीन हिंदु मुलींना घेऊन तेथे आला होता. त्याला नाव विचारले असता ‘सुमित शिंदे’ असे खोटे नाव सांगितले; मात्र तो टिळा लावण्यास विरोध करत होता. हिंदुसंघटनेच्या कार्यकर्त्यांना त्याचा संशय आल्याने त्याचे आधार कार्ड पडताळले असता तो मुसलमान असल्याचे लक्षात आले. या वेळी त्याच्यासमवेत आलेल्या २ अल्पवयीन हिंदु मुली घाबरून पळून गेल्या. यासमवेतच अन्य २ मुसलमान तरुणही हिंदु मुलींना घेऊन तेथे गरबा खेळण्यासाठी आले होते. या तीनही मुसलमान तरुणांना पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे.

या वेळी १ मुसलमान तरुण हिंदु मुलीला घेऊन गरबा खेळण्यासाठी दुचाकीवर आला होता; मात्र येथे आधार कार्ड पडताळल्याविना सोडत नाहीत, हे समजल्यावर त्याने तेथे क्षणभरही न थांबता पळ काढला. या वेळी सकल हिंदुसंघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सतर्क असलेल्या सकल हिंदूसंघटनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! अशीच सतर्कता गरब्याचे आयोजन करणार्‍या प्रत्येक आयोजकाकडे असायला हवी, तरच हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण होऊ शकेल ! – संपादक)

महाराष्ट्राला केरळ होऊ देणार नाही ! – सुधीर बहिरवाडे, हिंदु महासभा

हाच कार्यक्रम जर मुसलमानांचा असता आणि हिंदु तरुण एका मुसलमान मुलीला घेऊन कार्यक्रमात सहभागी झाला असता, तर चालले असते का ? हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राला केरळ होऊ देणार नाही. सोलापूर ‘लव्ह जिहाद मुक्त’ केल्याविना आम्ही गप्प बसणार नाही.