वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने ३ चिनी आस्थापनांवर पाकिस्तानला बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी लागणार्या उपकरणांचा पुरवठा गुपचूप केल्याचा ठपका ठेवला आहे. यावरून अमेरिकेने या आस्थापनांवर बंदी घातली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी दिली. मिलर म्हणाले की, ही बंदी ‘आंतरराष्ट्रीय परमाणु अप्रसार आणि निरस्त्रीकरण’, या नियमांच्या उल्लंघनावरून घालण्यात आली आहे.
‘जनरल टेक्नॉलॉजी लिमिटेड’, ‘बीजिंग लुओ लुओ टेक्नॉलॉजी डेव्हल्पमेंट कंपनी लिमिटेड’ आणि ‘चांगझोउ उटेक कंपोझिट कंपनी लिमिटेड’, अशी बंदी घालण्यात आलेल्या चिनी आस्थापनांची नावे आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेने ही कारवाई पाकिस्तानच्या ‘अबाबील’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्या चाचणीनंतर केली आहे.
संपादकीय भूमिकाअमेरिकेने एवढ्यावर न थांबता जिहादी पाकला साहाय्य करणार्या चीनला धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, तसेच यासाठी भारताने पुढाकार घेतला पाहिजे ! |