प्रियकरासह तिघांना पोलीस कोठडी

कणकवली : प्रियकराने २ मित्रांसह स्वतःच्याच प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना दारूम गावच्या माळरानावर १६ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ५.३० वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर बाळकृष्ण सदानंद तांबे (वय २६ वर्षे, रहाणार केळवली, राजापूर आणि सध्या रहाणार, नाद वैभववाडी), शैलेश शांताराम तांबे (वय ३४ वर्षे, रहाणार दारूम) आणि गणेश प्रकाश गुरव (वय २० वर्षे, रहाणार शिरवली) या तिघांना अटक केली. या तिघांना येथील न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘फिरायला गेलो असता प्रियकर बाळकृष्ण याने रिक्शामध्ये बलपूर्वक मद्य पाजले. त्यानंतर नशेत असतांना स्वत: अन् त्याच्या २ मित्रांनी बलात्कार केला.’
संपादकीय भूमिकासमाजाची नैतिकता किती खालावली आहे, ते अशा घटनांवरून दिसून येते ! यासाठी समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता रुजवण्याची नितांत आवश्यकता स्पष्ट होते ! |
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !