|
मुंबई – राज्याची अधिकृत भाषा मराठी असतांना दोन अधिवक्त्यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल मराठीऐवजी इंग्रजी भाषेत का नोंदवला ? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने अँटॉप हिल पोलिसांना केली आहे, तसेच कोणत्या कायदेशीर प्रावधानाच्या अंतर्गत हा गुन्हा इंग्रजी भाषेत नोंदवला, याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेशही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहेत. पोलिसांनी आपल्याला अवैधरित्या कह्यात ठेवल्याची आणि मारहाण केल्याची तक्रार अधिवक्त्या साधना यादव यांनी केली होती. त्याआधारे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता.
गृहखात्याच्या परिपत्रकानुसार, गुन्हा मराठी भाषेत नोंदवणे अनिवार्य आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवतांना तो नोंदवणार्या व्यक्तीने असंख्य चुका केल्याचे दिसून येत असल्याचेही न्यायालयाने सुनावणीच्या वेळी नमूद केले.
संपादकीय भूमिकाराज्याची अधिकृत भाषा कोणती, याविषयी न्यायालयाला पोलिसांना सांगावे का लागते ? मराठी भाषेत गुन्हा नोंद करण्याचे पोलिसांना लक्षात कसे येत नाही ? |