वाशिम – येथून १ सहस्र ४७० किलो गोमांस नेणारे वाहन अडवून पोलिसांनी १ लाख ९१ सहस्र १०० रुपये किमतीचे गोमांस जप्त केले. एकूण १२ लाख ११ सहस्र १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महंमद तन्वीर महंमद बुरहान, महंमद सोहेल महंमद शकील, महंमद जुनेद महंमद बशीर आणि महंमद इब्राहीम महंमद नूर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही करा ! – संपादक)