हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘नवरात्रोत्सवात गैरहिंदूंना प्रवेश वर्ज्य’!
मुंबई – हिंदूंच्या नवरात्री उत्सवामध्ये मूर्तीपूजा होते. मुसलमान जर मूर्तीपूजा मानत नाहीत, तर ज्या नवरात्रोत्सवात मूर्तीपूजा होते, तिथे ते का शिरकाव करत आहेत ? पूर्वीचे हिंदू असलेल्या आताच्या मुसलमानांना हिंदूंच्या नवरात्रोत्सव आदी सण-उत्सवांत सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी रितसर हिंदु धर्मात प्रवेश करावा. यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांना साहाय्य करतील. हा पर्याय सुद्धा आम्ही देत आहोत, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री. नितेश राणे यांनी केले आहे. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद ‘नवरात्रोत्सवात गैरहिंदूंना प्रवेश वर्ज्य’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी समितीचे देहली प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
हे पहा आणि इतरांनाही पहायला द्या –
🎥 नवरात्रि उत्सव में गैर हिन्दुओं का प्रवेश वर्जित | Nitesh Rane | #Navratri2023 https://t.co/ALZC7GP5Bx
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) October 14, 2023
आमदार श्री. नितेश राणे यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे :
१. नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमात अनेक मुसलमान युवक स्वतःचे खोटे ‘हिंदू’ नाव सांगून हिंदू युवतींशी ओळख वाढवतात. नंतर हेच विषय ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ इथपर्यंत जातात. हे सर्व रोखण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळांनी गरबा कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड तपासूनच सर्वांना प्रवेश द्यावा. ती व्यक्ती हिंदू नसल्यास त्यांना प्रवेश देऊ नये. तसेच हिंदू युवतींनीही ‘आपण नेमके कुणासह गरबा खेळत आहोत’, याविषयी सतर्क असले पाहिजे. याचसमवेत पालकांनीही ‘आपली मुलगी सुरक्षित घरी येत आहे ना ?’, हे पाहिले पाहिजे.
२. ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात हिंदू युवती आणि महिलांना खोटी स्वप्ने दाखवून फसवले जाते. हिंदू युवतींशी लग्न करून त्यांना विविध इस्लामी देशांत विकले गेल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. भारतातील अन्य राज्यांत लागू झालेल्या ‘लव्ह जिहादविरोधी कायद्या’चा अभ्यास करून महाराष्ट्रातही कडक आणि परिणामकारक असा कायदा येत्या डिसेंबरमध्ये होणार्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात येणार आहे.
३. जिहाद्यांना वर्ष २०४७ मध्ये ‘भारत एक इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे’, त्यासाठी हिंदू युवतींना ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून हिंदूंची लोकसंख्या न्यून करण्याचा प्रयत्न चालू आहे.
४. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड (भूमी) जिहाद’च्या प्रकरणांमुळे भारतात मुंबईसह अनेक शहरांत हिंदु लोकसंख्या न्यून होत चालली आहे.
५. भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल आणि हिंदूंची लोकसंख्या अशा प्रकरणांमुळे न्यून होऊ द्यायची नसेल, तर हिंदूंनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.