‘आम्हाला हमास आणि त्याच्या सैनिकांचा गर्व !’ – असगर अली करबलाई, काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, लडाख

लडाखमधील काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असगर अली करबलाई यांचे मानवताविरोधी विधान !

असगर अली करबलाई

लडाख – येथील काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असगर अली करबलाई यांनी इस्रायलवर आक्रमण करणारी जिहादी आतंकवादी संघटना हमासचे समर्थन केले आहे. ‘कारगिलची जनता हमासच्या पाठीशी उभी आहे. आम्हाला गर्व आहे की, आम्ही हमासच्या सैनिकांसमवेत उभे आहोत’, असे विधान त्यांनी केले. येथे १३ ऑक्टोबर या दिवशी हमासच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा ते बोलत होते. या वेळी यात सहभागी झालेल्या मुसलमानांच्या हातात इराणचे सर्वोच्च नेते महंमद अली खुमेनेई यांची छायाचित्र होते. (इराणच्या नेत्याचा आणि काँग्रेसचा काय संबंध ? काँग्रेस याविषयी सांगील का ? अशा मानसिकतेच्या काँग्रेसी लोकांचे भारतावर कधीतरी प्रेम असेल का ? – संपादक) यापूर्वीच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने पॅलेस्टाईनला समर्थन करणारा प्रस्ताव संमत केला आहे.

सौजन्य वॉइस ऑफ लडाख

असगर अली करबलाई पुढे म्हराले की, पॅलेस्टाईनवर बाँबफेक केल्याने हमास आणि त्याच्या सैनिकांना झुकावे लागेल, असे इस्रायलला वाटते; पण ते चुकीचे आहे. या आक्रमणात ठार झालेल्या सैनिकांचे आइ-वडील, भाऊ आदी उभे रहातील आणि इस्रायलला संपवण्याचा संदेश देतील.

संपादकीय भूमिका 

हमासने अनेक महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली, ४० लहान मुलांचा गळे चिरले, गर्भवती महिलेची पोट फाडून अर्भक बाहेर काढून दोघांची हत्या केली, असे अनेक असुरांनाही लाजवणारे अत्याचार करणार्‍याचा गर्व वाटणारे काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता काय आहे ?, हे यातून लक्षात येते ! अशा काँग्रेसवर आता बंदीच घातली पाहिजे !