‘श्रीसत्शक्ति’ यांच्यामध्ये ‘महासरस्वती’, ‘महाकाली’ आणि ‘महालक्ष्मी’ ही तिन्ही तत्त्वे आहेत. येणार्या काळात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ‘देवी’ म्हणूनच ओळखल्या जाणार आहेत. त्यांचे सौंदर्य विलक्षण आणि दैवी आहे. ते मानवी सौंदर्य नव्हे !’ – (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १४३, १३.५.२०२०)
सप्तर्षींनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या दिव्यत्वाचे जे वर्णन केलेले आहे, त्याची प्रत्यक्ष प्रचीती त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणारे आणि त्यांच्यापासून दूर असणारे साधकही घेत आहेत. साधकांच्या अनुभूतींतून त्यांच्यातील देवत्व सिद्ध होण्यासमवेत अनुभूती घेणार्या साधकांच्या श्रद्धेतही वाढ होत आहे. या अनुभूती वाचून अन्य साधकांनाही श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे दिव्यत्व लक्षात येऊन त्यांचीही श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याप्रतीची श्रद्धा वाढू दे, ही प्रार्थना ! |
ऑगस्ट २०२३ मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करण्यासाठी तमिळनाडू राज्यातील कांचीपूरम् या क्षेत्रातील जगप्रसिद्ध श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात गेल्या होत्या. श्रीसत्शक्ति आणि श्रीचित्शक्ति यांनी सायंकाळी होणार्या अभिषेकाला उपस्थित राहून सनातन संस्थेच्या वतीने देवीला कमलपुष्पांचा हार वाहिला. त्यानंतर श्री कामाक्षीदेवीचे मुख्य पुजारी शंकरगुरुजी यांनी प्रसादस्वरूप त्यांना कमळाचा हारच दिला. छायाचित्रात प्रसादस्वरूप कमळाच्या हारासह श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील देवीतत्त्वाची साधिकेला आलेली प्रचीती !
१. एका साधकाविषयी मनात नकारात्मक विचार येत असतांना मानसरित्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीत जाऊन त्यांना प्रार्थना करणे आणि त्यांचा हस्तस्पर्श अनुभवल्यावर शांत वाटणे
‘एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात एका साधकाने ‘मी त्यांच्याशी रागाने बोलले’, अशी माझी चूक सांगितली. तेव्हा उत्तरदायी साधिकेने दिलेला दृष्टीकोन मला स्वीकारता आला नाही. त्या वेळी माझ्या मनात त्या साधकाबद्दल अनेक नकारात्मक विचार येऊ लागले. माझ्या मनातील विचार थांबतच नव्हते. तेव्हा देवाने सुचवल्याप्रमाणे मी मानसरित्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीत गेले. मी त्यांचे चरण घट्ट पकडून त्यांना पुष्कळ आर्तभावाने ‘मला या प्रसंगातून बाहेर काढा. हे विचार माझे नाहीत. वाईट शक्ती माझ्या मनातील विचार वाढवत आहे. केवळ तुम्हीच मला यातून बाहेर काढू शकता’, अशी कळकळून प्रार्थना केली. तेव्हा मला दिसले, ‘मी प्रार्थना करत असतांनाच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी माझ्याकडे वात्सल्यभावाने पाहिले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला.’ मला त्यांचा हस्तस्पर्श जाणवला. तेव्हा क्षणभरातच मी शांत झाले. नंतर माझ्या मनात त्या साधकाविषयी कधीच नकारात्मक विचार आला नाही.
२. हे अनुभवल्यावर माझ्या मनात विचार आला ‘आता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझ्या मुलीला सौ. प्रियांका राजहंस हिला (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हिला विचारतील, ‘‘आई कशी आहे ?’’
३. देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी साधिकेच्या मनातील जाणल्याविषयी तिला आलेली प्रचीती
दुसर्या दिवशी प्रियांकाने मला सांगितले, ‘‘आज मी सेवेनिमित्त श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला अकस्मात् विचारले, ‘‘आई कशी आहे ?’’ मी त्यांना ‘बरी आहे’, असे सांगितले.’’ प्रियांकाचे बोलणे ऐकून मी तिला काल मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या संदर्भात आलेली अनुभूती आणि माझ्या मनात त्यांच्याविषयी आलेला विचार सांगितला. तेव्हा तिलाही त्याचे आश्चर्य वाटले. परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणेच ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातूनही देव आणि देवी दैवी अनुभूती देत आहे’, असे माझ्या लक्षात आले अन् माझ्याकडून कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.’
– सौ. अंजली अजय जोशी, सनातन आश्रम, मिरज. (२८.१.२०२१)
‘वेधले मानस, हरपली दृष्टी ।’
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाहिल्यावर साधिकेला आलेली अनुभूती
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटल्यावर भान हरपणे
‘मी एक मास रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहिल्यानंतर १६.१२.२०२१ या दिवशी रात्री ८.३० वाजता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला त्यांच्या खोलीत भेटायला बोलावले. मी त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांनी मला सुखासनावर (सोफ्यावर) बसायला सांगितले. मी त्यांच्याकडे एकटक बघतच राहिले. त्या वेळी माझे भान हरपले होते. त्यांनी मला माझ्या साधनेविषयी सांगितले आणि ‘भाग्यनगर येथील ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेला जाऊन पुन्हा रामनाथी आश्रमात या’, असे सांगितले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना पाहून ‘साक्षात् लक्ष्मीदेवी भेटली’, अशी अनुभूती येणे आणि त्यांच्याशी बोलायला शब्दच न सुचणे
हे सर्व श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मला सांगत असतांना माझी स्थिती ‘वेधले मानस, हरपली दृष्टी ।’, अशी झाली होती. ‘मला साक्षात् लक्ष्मीदेवी भेटली आहे’, असे वाटत होते. आमचे बोलणे चालू होते; पण ‘मी काय बोलते ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. मला त्यांच्याशी बोलायला शब्दच सुचत नव्हते.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या भेटीनंतर ४ – ५ दिवस ‘त्या साक्षात् समोर उभ्या आहेत आणि त्यांच्याकडून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे अनुभवणे
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीच्या बाहेर आल्यावर माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. ‘या डोळ्यांनी भूतलावर मी साक्षात् श्री लक्ष्मीदेवीला पाहिले’, अशी अनुभूती मला आली. असा आनंद मी कधीच अनुभवला नव्हता. त्यानंतर ४ – ५ दिवस मी सहज डोळे मिटले, तरी ‘माझ्या डोळ्यांसमोर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ उभ्या आहेत आणि त्यांच्याकडून प्रकाशमान चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसत होते.
‘माझी काही योग्यता नसतांनाही मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे दर्शन लाभले’, हे माझे भाग्यच आहे. त्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती पद्मा शेणै (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६२ वर्षे), भाग्यनगर (२७.२.२०२२)
|