विरार – वसई-विरारमध्ये बोगस परवान्याच्या आधारे प्रयोगशाळा चालवणार्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांना दिले आहेत. विम्याच्या लाभासाठी प्रयोगशाळेकडून बोगस कागदपत्रे सिद्ध केली जात असल्याची तक्रार ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’कडे करण्यात आली होती.