पणजी, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यात सर्व वयोगटांतील लोकांसाठीचे बेरोजगारीचे प्रमाण ९.७ टक्के आहे. बेरोजगारीच्या सूचीत गोवा राज्य देशभरात दुसर्या क्रमांकावर आहे, अशी माहिती भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने ‘पिरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे’ या अहवालात दिली आहे. हा अहवाल ९ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झाला आहे.
हा अहवाल जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे. बेरोजगारीचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ३.२ टक्के आहे. गोव्यात ग्रामीण भागात बेरोजगारी दर ११.३ टक्के आहे, तर शहरी भागात हे प्रमाण ८.७ टक्के आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण ८.७ टक्के, तर महिलांमध्ये १४.७ टक्के आहे. देशात बेरोजगारीमध्ये लक्षद्वीप पहिल्या क्रमांकावर आहे.