यापूर्वी हिंदूंना म्हटले होते आतंकवादी !
अलीगड (उत्तरप्रदेश) – हिंदु धर्म आणि भारत यांच्याविरोधात सातत्याने गरळओक करणारा अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने आता इस्रायल आणि हमास यांच्यातील लढाईमध्ये हमासचे समर्थन केले आहे. त्याने ट्वीट करून भारतातील हिंदुत्वनिष्ठांवरही टीका केली आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारतातील हिंदुत्वनिष्ठ इस्रायलचा जयजयकार करत आहेत, हे आश्चर्यजनक नाही; कारण भारतातील मुसलमान कुणाचे समर्थन करतात, यावरून त्यांचे संपूर्ण अस्तित्व निश्चित. भारतातील मुसलमान पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ उभे आहेत.
Unsurprising that Indian Hindu right wing is cheering for Israel as their entire existence is defined by opposition to what or who Muslims in India support.
With Palestine 🇵🇸
— Sharjeel Usmani (@SharjeelUsmani) October 7, 2023
१. इस्रालय आणि हमास यांच्यातील लढाईमध्ये भारताने इस्रालयचे समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमासच्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध करत भारत इस्रायलच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.
२. शरजिल उस्मानी याने वर्ष २०२१ भगवान श्रीरामाच्या संदर्भात ट्वीट करतांना ‘जय श्रीराम म्हणणारेे सर्व हिंदू आतंकवादी आहेत’, असे म्हटले होते. त्यावरून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यावर त्याला अटक करण्यात आली होती.
संपादकीय भूमिका
|