|
अमृतसर (पंजाब) – पाकच्या सिंध प्रांतातील सालेह हालेपोटो येथे २८ सप्टेंबरच्या रात्री काही मुसलमान युवकांनी येथील एका अल्पवयीन हिंदु मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केली. यानंतर त्याच्या मृतदेहाला झाडावर लटकावले. हत्यार्यांनी हिंदु मुलावर चोरीचा आरोप लावला आहे. तसेच पोलिसांनीही या प्रकरणी कोणतीच कारवाई हाती घेतली नसल्याचे समजते.
१. पीडित हिंदु कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या गावात चोरीची एक घटना घडली होती. त्याचा आरोप त्यांचा १७ वर्षीय मुलगा भगवानदास याच्यावर लावण्यात आला होता. मुलाने ‘मी चोरी केली नाही’, अशी शपथ घेऊन अनेक वेळा सांगितले, हात जोडले, तरीही मुसलमान जमीनदार महताब हालेपोटो आणि इब्राहिम पंवार यांनी घरात घुसून त्याला मारहाण केली अन् त्याचे अपहरण केले.
😡
When will these atrocities end after decades? The world is passively observing while #Pakistan‘s Hindu minority is brutally suppressed. No country has stepped out to offer support or to speak out against Pak, so where will they go? #HindusUnderAttack #SindhBleeds #shameful pic.twitter.com/8y2EitzAXG— Your Views Your News (@urviewsurnews) September 29, 2023
२. २९ सप्टेंबरच्या सकाळी भगवानदासचा मृतदेह एका झाडावर लटकलेल्या स्थितीत मिळाला. पीडित कुटुंबाने आरोप केला आहे की, दोघा जमीनदारांनीच त्यांच्या मुलाची हत्या केली आहे.
३. ‘आमच्या मुलाला बळजोरीने घेऊन जात असतांना आम्ही विरोध केल्यावर आमच्यावर गोळीबार करून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. घरून कुणी बाहेर आले, तर गोळ्या डागल्या जातील’, असे दोघा हत्यार्यांनी आम्हाला म्हटले होते, असे दु:खही पीडित कुटुंबाने व्यक्त केले.
४. या प्रकरणी पालीस ‘भगवानदासने आत्महत्या केली’, अशा प्रकारे बनाव रचत आहे. हत्यारे पोलिसांवरही दबाव आणत असून कुटुंबाच्या साहाय्याला कुणी यायला सिद्ध नाही.
संपादकीय भूमिका
|