कोल्हापूर – ‘कोल्हापूर गॅझेट’मध्ये जिल्ह्यात १ लाख ४० सहस्र कुणबी जातीच्या नोंदी आहेत. त्या सर्वांना राज्य सरकारने ८ दिवसांत जातीचे प्रमाणपत्र द्यावे. मी एकदाच सरकारला विनंती करत आहे. मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी चेतावणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली. ते कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते.
१. मुख्यमंत्र्यांनी ‘कोल्हापूर गॅझेट’ शिंदे समितीकडे द्यावे, तसेच मंत्रीमंडळ उपसमितीकडे द्यावे. त्यांनी संपूर्ण दस्ताऐवज पडताळून पहावेत आणि त्यानंतर ज्या नोंदी आढतील, त्या सर्वच मराठा समाजाला जात प्रमाणपत्र द्यावे.
२. जिल्ह्यात सापडलेल्या नोंदीपैकी ३५ ते ४० सहस्र जात प्रमाणपत्रे वाटप केली आहेत. हे प्रमाण अल्प असून उर्वरित प्रमाणपत्रे येणार्या ८ दिवसांत द्यावीत.
३. राज्य सरकारने केवळ ३० मोडीलिपी अभ्यासकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी ही संख्या पुरेशी नाही. या अभ्यासकांचे वेतन सरकार देत नाही. सरकारला वेतन देणे शक्य नसल्यास त्यांनी तसे सांगावे, आम्ही समाजासाठी म्हणून मोडीलिपी अभ्यासक नेमतो.
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !
ग्रामीण पातळीपर्यंत दर्जेदार इंटरनेटसाठी ‘महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ स्थापन !