
कोल्हापूर – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा हे १९ अन् २० जून या दिवशी कोल्हापूर येथील दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणारे विविध कार्यक्रम आणि पोलीस परेड मैदानावरील भव्य सभेची सिद्धता यांचा आढावा राज्याचे उच्च अन् तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. त्यांनी या निमित्ताने सभास्थळाची पहाणी केली, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
या प्रसंगी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसराच्या विकासासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने १ सहस्र ५०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे मंदिर परिसराचा विकास, वारसा संवर्धन, तसेच भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण होण्यास गती मिळणार आहे. या निर्णयाविषयी कोल्हापूरकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ऐतिहासिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २० जून या दिवशी सकाळी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन ते परिसरातील विकासकामांची पहाणी करतील. यानंतर भव्य जाहीर सभा आणि त्यानंतर इचलकरंजी येथे ‘कलाप्पाणा आवाडे इचलकरंजी जनता बँके’च्या प्रधान कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित रहाणार आहेत.’’
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !
ग्रामीण पातळीपर्यंत दर्जेदार इंटरनेटसाठी ‘महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ स्थापन !