शासनाकडून भूमी प्रदान !

मुंबई – पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती ३ हेक्टर १२ गुंठे इतक्या भूमीवर ‘गोमाता पालन-संवर्धन केंद्र’ उभारणार आहे. यासाठी पंढरपूरच्या यमाई तलावालगतची गट क्र. १६१ मधील भूमी महाराष्ट्र शासनाकडून देवस्थानाला देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या कार्यकारी अधिकार्यांनी ‘गोमाता पालन-संवर्धन केंद्रासाठी या जागेची मागणी केली होती. येत्या ३ वर्षांच्या आत या जागेवर ‘गोमाता पालन-संवर्धन केंद्र’ चालू करणे बंधनकारक रहाणार आहे. ज्या कारणासाठी शासनाने ही भूमी दिली आहे, त्याच कारणासाठी त्याचा उपयोग करणे बंधनकारक रहाणार आहे. अन्य कोणत्या कारणासाठी या भूमीचा उपयोग करावयाचा झाल्यास त्यासाठी शासनाची अनुमती घ्यावी लागणार आहे.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.