डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !

मध्यप्रदेशात अनेक मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर केंद्र सरकारचा निर्णय

(सिरप म्हणजे द्रवरूपातील औषध)

नवी देहली – डॉक्टरांच्या चिठ्ठीविना (‘प्रिस्क्रिप्शन’विना) आता औषधांच्या दुकानात कोणतेही सिरप मिळणार नाही. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक अधिसूचना (नोटिफिकेशन) प्रसारित केली आहे. यात म्हटले आहे की, आता ‘ड्रग्ज रूल्स १९४५’मधील ‘शेड्यूल के’ (Schedule K) मधून ‘सिरप’ हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. या नियमांतर्गत काही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विक्री करण्याची सवलत होती. आता सरकारने ‘सिरप’ हा शब्द त्यातून वगळला आहे.