गदर २, द कश्मीर फाइल्स आणि द केरल स्टोरी या चित्रपटांना मिळालेली लोकप्रियता निराशाजनक ! – अभिनेते नसीरुद्दीन शाह

चित्रपट अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा जळफळाट !

चित्रपट अभिनेते नसीरुद्दीन शाह

मुंबई – ‘गदर २, द कश्मीर फाइल्स, द केरल स्टोरी या चित्रपटांना मिळणारी लोकप्रियता पाहून मी निराश झालो आहे. ही लोकप्रियता निराशजनक आहे, असे विधान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत केले.

या वेळी शाह यांना विचारण्यात आले की, बॉलिवूडमध्ये चित्रपट निर्मितीचा हेतू पालटला आहे का ? यावर शाह म्हणाले, ‘‘तुम्ही जितके आंधळे राष्ट्रवादी व्हाल, तितके लोकप्रिय व्हाल; कारण तेच या देशावर राज्य करत आहेत. केवळ देशावर प्रेम करणे पुरेसे नाही, तर त्याविषयी ढोल बडवणे आणि काल्पनिक शत्रू सिद्ध करणे आवश्यक बनले आहे. चित्रपट निर्मात्यांना सर्व चुकींच्या गोष्टींचा गौरव करणारे आणि इतर समुदायांना न्यून लेखणारे चित्रपट बनवण्यासाठी भाग पाडले जात आहे. हे धोकादायक आहे.’’

संपादकीय भूमिका

हे चित्रपट हिंदूंवरील अन्यायावर आणि धर्मांध मुसलमानांच्या अत्याचारी अन् क्रूर मानसिकतेवर प्रकाश टाकणारे असल्याने नसीरुद्दीन शाह यांच्यासारख्या हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला नाही, तरच नवल ! शाह यांच्या धर्मबांधवांनी हिंदूंवर केलेले अत्याचार कधीही समाजासमोर येऊ नयेत, असे त्यांना वाटते का ? अशांनी त्यांच्या चित्रपटात किती हिंदुद्वेष जोपासला असेल ? अशांच्या चित्रपटांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना हिंदुऐक्याची चुणूक दाखवून द्यावी !