‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करणे,’ हा एक कलमी कार्यक्रम राबवण्यासाठी आणि हिंदुद्वेषी असलेल्या विरोधी पक्षांची आघाडी करण्यात आली आहे. त्याला त्यांनी ‘इंडिया’ (I.N.D.I.A) असे नाव दिले आहे. यातून एक सूत्र प्रकर्षाने जाणवले, ते म्हणजे वृत्तपत्रात कधी कधी तोतया डॉक्टर, पोलीस अधिकारी अशा स्वरूपाच्या बातम्या वाचनात येतात, तशी ही ‘इंडिया’ ही आघाडी आहे. या आघाडीच्या ‘I.N.D.I.A’ या इंग्रजी अक्षरांचा माझ्या लक्षात आलेला अर्थ पुढे देत आहे.
I – इमिजेट (तात्काळ)
N – निगेटिव्ह (नकारात्मक)
D – डिस्ट्रक्टिव्ह (विनाशकारी)
I – इलनेस (आजारपण)
A – अलायंस (आघाडी )
ही आघाडी कोणताही सकारात्मक विचार न करता मोदी आणि हिंदु यांच्या द्वेषाचा नकारात्मक एक कलमी कार्यक्रम घेऊन सिद्ध झालेली आहे. तसेच ही आघाडी ‘संपूर्ण देशाला विनाशकारी नरकात ढकलणारी’, अशी ही एकमेव आघाडी आहे. त्यामुळे भारतीय मतदारांनी ‘इंडिया’ आघाडीपासून सावध रहावे.’
– श्री. दत्तात्रय पटवर्धन, कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग (२८.८.२०२३)