अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

‘शिक्षणाचा प्रभाव असलेल्या आणि विज्ञानावर विश्वास ठेवणार्‍या व्यक्तीला अध्यात्म कसे समजावून सांगावे ?’, याचे उत्तर आहे, ‘अध्यात्म समजावून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता असते. ती जर नसेल, तर निदान श्रद्धा तरी असावी लागते. श्रद्धा दोघांतही सापडते. केवळ श्रद्धास्थाने वेगवेगळी असतात. कुणी शंकराचार्यांवर श्रद्धा ठेवतो, तर कुणी फ्रॉईडवर; परंतु श्रद्धेविना कुणाचेही भागले नाही. असे असले, तरी शंकराचार्यांवर श्रद्धा ठेवणारा मागासलेला आणि फ्रॉईडवर श्रद्धा ठेवणारा पुरोगामी, हे कोणते तर्कशास्त्र आहे ? जेवढे छेद आधुनिकांनी मांडलेल्या संशोधनाला गेले आहेत, त्यापेक्षा न्यून छेद जुन्या तत्त्वज्ञांच्या संशोधनाला गेले आहेत. जुन्यांच्या मानाने आधुनिक तत्त्वज्ञांच्या चुका अधिक आहेत.’

– प.पू. स्वामी वरदानंद भारती