निवडणूक शपथपत्रात २ गुन्ह्यांची नोंद नसल्याचे प्रकरण

नागपूर – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्ष २०१४ मधील निवडणूक शपथपत्रात २ गुन्ह्यांची नोंद नसलेल्या प्रकरणाची सुनावणी ५ सप्टेंबर या दिवशी होणार होती; परंतु न्यायालयाने निकालाचा दिनांक ८ सप्टेंबर असा निश्चित केला आहे. अधिवक्ता सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.
Devendra Fadnavis : निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याचं प्रकरण, फडणवीसांविरोधातील याचिकेवर 8 सप्टेंबर रोजी निकाल https://t.co/QbV1Lvw7OU#DevendraFadnavis #affidavit #SatishUke
— ABP माझा (@abpmajhatv) September 5, 2023
१. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील पहिली तक्रार ही अपकीर्ती केल्याच्या गुन्ह्याच्या (क्रिमिनल डिफेमेशन) संदर्भातील आहे. फडणवीस नगरसेवक असतांना त्यांनी एका सरकारी अधिवक्त्यांविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. ‘त्या खटल्यातून दूर करण्यात यावे’, अशी मागणी करणारे प्रसिद्धीपत्रक त्यांनी काढले होते. त्यावर अधिवक्त्याने ‘क्रिमिनल डिफेमेशन’ प्रविष्ट केले. नंतर त्यांनी ते परतही घेतले आहे.
२. दुसरे प्रकरण एका झोपडपट्टीवासियांसाठी आंदोलन करतांनाचे आहे. ‘एका जागेवरील झोपडपट्टीला ‘मालमत्ता कर’ लावण्यात यावा’, असे पत्र तत्कालीन नगरसेवक फडणवीस यांनी महानगरपालिकेला दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी कृती केली. यावर एका व्यक्तीने ‘ती भूमी खासगी असून माझ्या मालकीची आहे’, अशी तक्रार केली होती. नंतर ही तक्रार उच्च न्यायालयाने फेटाळली.
‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी सेवेची संतपरंपरा आणि आरोग्याचा मिलाप !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !