आसाममध्ये हिंदु धर्म स्वीकारणार्‍या मुसलमान महिलेला ठार मारण्याची धमकी !

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचा आदेश

दिब्रुगड (आसाम) – येथील अलीमा अख्तर नावाच्या महिला डॉक्टरने हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर तिला तिचे कुटुंब आणि धर्मबांधव यांच्याकडून ठार मारण्याची धमकी दिली जात आहे, अशी माहिती अलीमा यांनी व्हिडिओ प्रसारित करून दिली. अलीमा या आसाम वैद्यकीय महाविद्यालयात काम करत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी या व्हिडिओची नोंद घेत तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश दिला.

१. अलीमा अख्तर यांनी आरोप केला आहे की, त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या मौलवीशी विवाह करण्यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे त्यांनी सोडले.

२. दुसरीकडे अलीमा यांचा भाऊ वकील खाने याने पोलिसांकडे त्याची बहीण बेपत्ता असल्याची तक्रार करत याची माहिती ट्वीट करून दिली. यावर आसामच्या पोलीस महासंचालकांनी अलीमा यांच्या व्हिडिओची माहिती देत अलीमा यांना धमकी देणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे खान याला सांगितले.


३. पोलीस महासंचालकांच्या विधानावर वकील खान म्हणाला की, मी त्या व्हिडिओमधील तिची विधाने स्वीकारत नाही. या घटनेची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी माझ्या बहिणीला शोधण्याचे आश्‍वासन दिले होते; पण ते पाळलेले नाही.

संपादकीय भूमिका

‘हिंदु-मुसलमान भाऊ भाऊ’ म्हणणारे आणि हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे याविषयी काही बोलतील का ?