मॅफेड्रॉन तस्करीप्रकरणी मुसलमान अटकेत !

प्रतिकात्मक छायाचित्र

पनवेल – ३२ कोटी रुपयांच्या मॅफेड्रॉनच्या तस्करी प्रकरणात मकोका (संघटित गुन्हेगारी कायदा) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आणि गेल्या ६ महिन्यांपासून फरार असलेला छोटू कमर अहमद अन्सारी (वय ४७ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून तळोजा (रायगड) येथे भाड्याने रहात होता. त्याला १० जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

संपादकीय भूमिका

समाजाला व्यसनाधीन करणार्‍यांना आजन्म कारावासात डांबायला हवे !