मलेशियाच्या पंतप्रधानांकडून मशिदीत हिंदु तरुणाचे धर्मांतर !

कुआलालंपूर (मलेशिया) – मलेशियाचे पंतप्रधान दातूक सेरी अन्वर इब्राहिम यांनी काही दिवसांपूर्वी एका हिंदु तरुणाचे इस्लाममध्ये धर्मांतर केले. या घटनेनंतर वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान इब्राहिम यांनी सेलांगोर येथील एका मशिदीत नमाजपठणानंतर एका हिंदु तरुणाचे उघडपणे धर्मांतर करून त्याला इस्लामची दीक्षा दिली.

या घटनेविषयी मलेशियाच्या पेनांग प्रांताचे माजी उपमुख्यमंत्री प्रा. पी. रामासामी म्हणाले, ‘‘अशा प्रकारचे कृत्य हेच दाखवते की, पंतप्रधान इब्राहिम यांना हिंदूंविषयी जराही आदर नाही. देशाच्या प्रगतीसाठी हिंदूंनी फार त्याग केला आह, तसेच बलीदान दिले आहे. अन्वर इब्राहिम हे तेच नेते आहेत, ज्यांच्यावर भारतीय आणि अन्य लोकांनी विश्‍वास ठेवला होता ? एका भारतीय विद्यार्थ्याने पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांना शिक्षणाच्या संदर्भात प्रश्‍न विचारल्यावर त्यांची वागणूक अत्यंत वाईट होती. ती भारतीय स्वीकारू शकत नाहीत. आम्ही या गोष्टीची कल्पनाच करू शकत नाही की, पंतप्रधान इब्राहिम यांनी मशिदीमध्ये एका हिंदु तरुणाचे धर्मांतर केले. असे यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानांनी केले नव्हते. हिंदु तरुणाचे धर्मांतर करणे त्यांना का आवश्यक वाटते ? यात त्यांच्यासाठी काय विशेष आहे ? पंतप्रधान हे दाखवू इच्छित आहेत का की, या देशात इस्लाम आणि अन्य धर्म एकत्र राहू शकत नाहीत ? धर्मांतराद्वारे अन्य धर्मियांना बाहेर काढण्याचा हा प्रकार आहे का ?’’

संपादकीय भूमिका

  • अशा बातम्या भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात आणि निधर्मीवादीही याविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
  • इस्लामी देशांमध्ये हिंदूंचे धर्मांतर केले जाते, हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केले जातात, तसेच हिंदूंची मंदिरे पाडली जातात, तरीही यांविषयी जगातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, तसेच इस्लामी देशांची संघटना कधीच तोंड उघडत नाही; मात्र भारतात एखाद्या मुसलमानावर कथित अत्याचार झाला, तर हेच लोक आकाश-पाताळ एक करत हिंदूंना तालिबानी ठरवतात !