
‘हिंदु संस्कृतीने माणसाला देवत्वापर्यंत पोचण्याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्पन्न करण्याची पराकाष्ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली. तथापि हे जग केवळ सत्त्वाच्या एकाच धाग्याने विणले गेले नाही. ते सत्त्व, रज आणि तम या ३ धाग्यांनी विणले गेले आहे. ज्याला या जगात जगायचे असेल, जिंकायचे असेल, कमीत कमी इतरांकडून, अन्यायाकडून पराभूत व्हायचे नसेल, तर त्याला सत्त्व, रज आणि तम या तिन्ही परिस्थितीतील अवस्थांना यशस्वीपणे तोंड देता येईल, असे त्रिशूली साधनच वापरले पाहिजे. म्हणून पात्रापात्र विवेक ही गीतेची शिकवण विसरता कामा नये.
(साभार : ‘सहा सोनेरी पाने’ ग्रंथातून -सोनेरी पान पाचवे-प्रकरण चौथे)
संकलक : श्री दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !