गुजरातमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
कर्णावती (गुजरात) – येथील मेहमदाबाद येथे तौसिफ पठाण नावाच्या मुसलमानाने वारंवार लैंगिक छळ केल्यामुळे एका हिंदु विवाहित महिलेने आत्महत्या केली. तिने आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या पत्रामध्ये तौसिफने केलेल्या लैंगिक छळामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
‘तौसीफ ने मेरी ज़िन्दगी बर्बाद कर दी’: गुजरात में हिन्दू महिला ने की आत्महत्या, बदनाम करने और पति की हत्या की देता था धमकी, घर में घुस छेड़खानीhttps://t.co/Xx24qNym9H
— HinduPost (@hindupost) August 17, 2023
१. एका वृत्तानुसार ही महिला मेहमदाबाद येथे तिचा पती आणि दोन मुली यांच्यासोबत रहात होती. काही दिवसांनंतर येथील रहिवासी तौसिफ याने तिला त्रास देण्यास चालू केले होते. त्याने अनेकदा तिचा विनयभंग केला. तो तिच्या घरातही घुसायचा.
२. या हिंदु महिलेने तौसिफच्या कृत्यावर आक्षेप घेतला; मात्र तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करतच होता. गेल्या काही मासांपासून तौसिफ तिचे मोठ्या प्रमाणात शोषण केले. तौसिफने तिच्याकडून पैसेही उकळले होते.
३. एवढेच नाही, तर त्याने मयताला धमकावून सांगितले, ‘तू माझ्याशी बोलली नाहीस, तर तुझ्या पतीला मारून टाकीन आणि समाजात तुला अपकीर्त करीन.’ या धमकीनंतर महिलेने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
४. मृत महिलेच्या भावाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तौसिफच्या विरोधात कारवाई चालू केली आहे. त्याला अटक करण्यासाठी पथके सिद्ध केली आहेत.
संपादकीय भूमिकाअशांना भर चौकात फाशी दिली, तरच अन्य लव्ह जिहाद्यांवर वचक बसेल ! |