|
पलवल (हरियाणा) – हरियाणातील नूंहमध्ये ३१ जुलै २०२३ या दिवशी विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या बृजमंडल जलाभिषेक यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी नियोजनबद्धरित्या आक्रमण केले होते. या प्रकरणी ‘सर्व हिंदु समाजा’ने १३ ऑगस्ट या दिवशी पलवल येथे महापंचायतीचे आयोजन केले होते. यात २८ ऑगस्ट या दिवशी पुन्हा एकदा बृजमंडल जलाभिषेक यात्रा काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महापंचायतमध्ये कथित चिखावणीखोर भाषणे केल्यावरून पोलिसांनी स्वतःहून अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या महापंचायतीचे चित्रीकरण केले होते. त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस भाषण करणार्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या महापंचायतीमध्ये भाजपचे काही नेते आणि काही गावांचे सरपंच उपस्थित होते.
पलवल की महापंचायत में हिंदुओं की हुंकार, नूंह में 28 अगस्त को बृजमंडल यात्रा फिर निकालने का ऐलान#HinduMahapanchayat #brijmandalyatra https://t.co/wZxdzComhe
— Hindustan (@Live_Hindustan) August 14, 2023
या महापंचायतीमध्ये नूंह येथील हिंसाचाराची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करणे, नूंह येथे रहात असलेल्या रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना हाकलणे, काँग्रेसचे आमदार मामन खान यांना अटक करणे, हिंसाचारारत ठार झालेल्या हिंदूंच्या नातेवाइकांना प्रत्येकी १ कोटी रुपये, तर घायाळांना प्रत्येकी ५० लाख रुपये हानीभरपाई देणे, हिंदूंवर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेणे, हिंसाचार करणार्यांवरील खटले अन्य ठिकाणी चालवणे, नूंह येथील हिंदूंना शस्त्र ठेवण्याचा परवाना देणे, तसेच नूंहमध्ये धडक कृती दलाची तुकडे तैनात करणे आदी मागण्या करण्यात आल्या.
संपादकीय भूमिकाएरव्ही सामान्य लोकांना ‘तक्रार आल्यावर गुन्हा नोंदवू’ असे सांगणारे पोलीस हिंदूंच्या विरोधात मात्र स्वतःहून तात्काळ गुन्हा नोंदवतात, हे लक्षात घ्या ! हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना हे अपेक्षित नाही ! |