९ ऑगस्ट या दिवशीच्या लेखात आपण पूर्वोत्तर भारत, म्यानमार भागातील चीनच्या सुप्त आकांक्षा आणि त्याला भारताच्या वाढत्या प्रभावाची भीती यांमुळे चाललेल्या भौगोलिक राजकीय (जिओपोलिटीकल) शह-काटशहाच्या खेळाचे मणीपूरवर होणारे परिणाम काय आहेत ? याची चर्चा केली. या लेखात आपण मणीपूर हिंसेमुळे हिंदूंना आणि भारताला अपकीर्त करण्यासाठी जगभर त्याची चर्चा करण्यामागे चर्च आणि साम्यवादी (कम्युनिस्ट) यांची मानसिकता काय असेल ? याची चर्चा करू. साम्यवादी विचारधारेने जगभरात १० कोटी आणि भारतात बंगालच्या मारीचझापी येथील ५ सहस्र हिंदू नामशूद्र दलित हत्याकांडापासून केलेली कित्येक हत्याकांडे अन् चर्चने आजपर्यंत आयर्लंडमध्ये ‘माग्दालिन लाऊंड्रिज’सारखे केलेले कोट्यवधी महिलांचे क्रूर नरसंहार यांमुळे या दोघांच्या मनात मोठा न्यूनगंड निर्माण झालेला आहे. या न्यूनगंडातून बाहेर येण्यासाठी साम्यवादी आणि चर्च प्रत्येक ठिकाणी हिंदूंना त्याच प्रकारच्या आरोपात घेरण्याचा प्रयत्न करत असतात. जसा आता मणीपूरच्या निमित्ताने जगभर चालू आहे, त्याचाच हा संक्षिप्त आढावा येथे देत आहे.
१. भाजप – ख्रिस्ती मतदार संबंध आणि चर्चची द्विधा स्थिती !
‘पूर्वोत्तर भारतामध्ये भाजपचा हिंदु राष्ट्रवाद विकला जाणार नाही’, या भ्रमात चर्च जगत होते. आसाम वगळता अन्य ६ राज्यात हिंदू राजकारण करण्यासाठी मतदानाच्या स्थितीला नव्हते. यामुळे इथे भाजपची डाळ शिजणार नाही हा सिद्धांत ! पण वर्ष २०१४ मध्ये देहलीत भाजप आल्यावर वर्ष २०१६ ला भाजपने आसाम जिंकले आणि हिमंत बिस्व सरमा यांनी स्वतःचे जुने संबंध, राजकीय प्रतिभा वापरून एक एक राज्य आपल्या अधीन घ्यायचा सपाटा लावला. यात भाजपने मणीपूरही जिंकले.
आता भाजप केरळसह दक्षिण भारतात ख्रिस्ती समाजात हातपाय पसरत आहे. कित्येक नावाजलेले कॅथॉलिक बिशप शेकडो कोटी रुपयांचे भ्रष्टाचार, करचुकवेगिरी, भूमी घोटाळे यात गळ्यापर्यंत फसलेले आहेत. त्यांचे अन्वेषण चालू आहे. यामुळे सामान्य ख्रिस्ती आणि चर्च नेतृत्व यांमध्ये अविश्वासाचे मोठे वातावरण आहे. कित्येक केंद्रीय अन्वेषण संस्था यात खोलात गेल्या आहेत आणि एवढे असूनही चर्च याविरुद्ध जराही बोंब मारू शकत नाही. चर्च यामुळे द्विधा स्थितीत आहे.
२. ‘परदेशी योगदान नियमन कायद्या’मुळे (‘एफ्.सी.आर्.ए.’ मुळे) चर्चना वेदना
‘एफ्.सी.आर्.ए.’च्या अंतर्गत भारतात २०२१-२२ या वर्षात २२ सहस्र कोटी रुपये आले. यापैकी ९९.९९ टक्के पैसा चर्चशी संबंधित संस्थांना आला आणि यातील ९५ टक्के पैसा ज्या हेतूने आणला, तो वळवून धर्मांतर, राजकीय प्रचार, खोट्या न्यायालयीन याचिका यांसाठी चर्च व्यय (खर्च) करत होता. ‘लिगल राईट्स ऑब्जर्व्हेटरी (एल्.आर्.ओ.)’ने वर्ष २०२० ते २०२२ या काळात चर्चशी संबंधित ६५० संस्थांच्या खोट्या खेळांचे पुरावे जमा करून सरकारला दिले आणि त्यावर मोठ्या कारवाया होऊन आजपर्यंत अनुमाने १६ सहस्र संस्थांचे ‘एफ्.सी.आर्.ए.’चे परवाने रहित झाले आहेत. चर्चसाठी हा झटका जीवघेणा आहे. याचा परतावा चर्च ‘जगभर भाजपविरोधी राळ उठवून करणार’, त्यासाठी मणीपूर ही आजपर्यंत मिळालेली सगळ्यात मोठी संधी आहे !
३. चर्च आणि साम्यवादी माध्यमांना (मिडियांना) मणीपूरची सुवर्णसंधी
मणीपूरच्या रूपाने चर्चला या धडक कारवाईचा सूड उगवण्याची नामी संधी हाती आली आहे. ‘भाजपशासित राज्यात ‘हिंदु मैतेई’ भाजप राज्य सरकारच्या साहाय्याने ‘कुकी ख्रिस्ती’ समाजाचे शिरकाण करत आहेत’, या खोट्या भूमिकेवर जगभर चर्चचा अपप्रचार चालू आहे.
प्रत्यक्षात भारत-म्यानमार सीमेवरच्या मोरेह शहरात असलेल्या तमिळ हिंदूंच्या मंदिरापासून ते कांगपोकपी, चुराचांदपूरच्या हिंदु मंदिरापर्यंत शेकडो मंदिरे गेल्या ३ मासांच्या ख्रिस्त्यांच्या हिंसाचारात उध्वस्त झालेली आहेत. मोरेह शहरात गेली २०० वर्षे रहाणारे तमिळ हिंदू ‘मोठे व्यापारी’ म्हणून ओळखले जातात आणि सध्या त्यांची लोकसंख्या अनुमाने १७ सहस्र आहे. हे तमिळ हिंदू तिथे ब्रिटीश काळापासून आहेत (या तमिळ हिंदूंना तिथे ‘काला लुम्यो’ म्हणतात.); पण या मंदिर विध्वंसाची बातमी लपवून फक्त चर्च पाडल्याच्या खोट्या बातम्या साम्यवादी प्रभावित आणि चर्च प्रायोजित भारतीय अन् जागतिक इंग्रजी माध्यमे भारतासह जगभरात पसरवत आहे.
प्रत्येक घटनेचा वापर करून जगभरातून पैसे जमवायचे, हा चर्चचा जुना धंदा आहे. ‘ओपन डोअर युके’ या चर्च चॅरिटी संस्थेने तात्काळ मणीपूरच्या ख्रिस्ती पीडितांच्या नावाने देणग्या जमा करण्यास प्रारंभ केलेला आहे. ‘प्रत्येक पीडितासाठी १७ ब्रिटीश पौंड आणि प्रत्येक पीडितासाठी घर बांधून देण्यासाठी ५० पौंड द्या’, असे ते आवाहन आहे. त्यांच्या संकेतस्थळावर पुढील लिखाण दिलेले आहे,
‘‘Christians in Manipur, India, are facing a crisis after an outbreak of ethno-religious violence earlier this month. At least 60 believers have been killed, hundreds of churches and other Christian buildings have been burned down and more than 10,000 Christians have had to flee their homes. Many churches were burned in front of us, and it has been very difficult to see this unfold before us, says Viren, a local Christian caught up in the violence. We want to be strong. Pray that God helps us.
Today, will you help your Indian brothers and sisters as they face a new crisis?
Every 17 could provide emergency food and aid for a believer in India affected by violent persecution.
Every 50 could help provide shelter for a believer displaced by violent persecution.’’
(अर्थ : ‘‘या मासाच्या प्रारंभीला वांशिक-धार्मिक हिंसाचाराच्या उद्रेकानंतर भारतातील मणीपूरमधील ख्रिस्त्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. किमान ६० जण मारले गेले आहेत, शेकडो चर्च आणि इतर ख्रिस्ती इमारती जाळल्या गेल्या आहेत अन् १० सहस्रांहून अधिक ख्रिस्त्यांना त्यांच्या घरातून पळून जावे लागले आहे. हिंसाचारात अडकलेला स्थानिक ख्रिस्ती वीरेन म्हणतो, ‘‘आमच्यासमोर अनेक चर्च जाळण्यात आले आणि हे आपल्यासमोर उलगडतांना पहाणे पुष्कळ कठीण होते. आम्हाला मजबूत व्हायचे आहे. देव आम्हाला साहाय्य करील, अशी प्रार्थना करा.’’
आज, तुम्ही तुमच्या भारतीय बंधू भगिनींना नवीन संकटाचा सामना करत असतांना त्यांना साहाय्य कराल का ?
हिंसक छळामुळे प्रभावित झालेल्या भारतातील प्रत्येक आस्तिकांसाठी १७ (१७ पौंड) आपत्कालीन अन्न आणि साहाय्य देऊ शकते. हिंसक छळामुळे विस्थापित झालेल्या आस्तिकासाठी प्रत्येक ५० (५० पौंड) आश्रय देण्यास साहाय्य करू शकेल.’’
थोडक्यात काय, तर निर्णय न्यायालयाचा, दंगा चालू झाला कुकीबहुल चुराचांदपूरला आणि दोष हिंदु मैतेई समाजाचा ! हाच तर्क ‘गोध्रा हत्याकांड’ झाल्यावर वापरला गेला आणि आजही रेल्वे कुणी आणि का जाळली ? यावर कुणीही बोलत नाही ! मणीपूर हिंसेनंतर याच संधीचे सोने करण्यासाठी परत एकदा दोघे एकत्र आहेत. मणीपूरवरून हिंदूंची, भाजप आणि संघाची, मोदी-शहांची अपकीर्ती करण्याची संधी मिळाल्याचा आनंद यांच्या बोलण्यात आणि लिखाणात ओसंडून वहात असतांना सहज दिसू शकतो. इथे त्यापैकी काही उदाहरणे बघू!
३ अ. मणीपूर सूत्रावरून हिंदू, भाजप आणि संघ, मोदी-शहा यांची करण्यात येणारी अपकीर्ती :
अ. चिनी दूतावासाच्या पैशावर चालणारे इंग्रजी वृत्तपत्र ‘द हिंदू’ लिहिते, ‘मणीपूर हिंसाचाराने केरळमधील भाजप, चर्च हनीमूनची समाप्ती (BJP honeymoon ends in Kerala).’
आ. ‘डेक्कन हेरॉल्ड’ वृत्तपत्र म्हणते, ‘केरळच्या बिशपची मणीपूर हिंसाचारावरून मोदींवर टीका (Kerala bishop takes pot-shots at Modi over Manipur violence).’
इ. साम्यवाद्यांचे प्रचारतंत्र असलेले वृत्तसंकेतस्थळ ‘द वायर’ म्हणते, ‘मणीपूर हिंसाचारामुळे मोदींच्या ख्रिस्ती संपर्क मोहिमेला धक्का (Manipur Violence Is a Setback for Modi’s Christian Outreach Moves in Kerala).’
ई. ज्येष्ठ पत्रकार अरुण पुरी यांचा ‘इंडिया टुडे’ म्हणतो, ‘ख्रिस्ती धर्माचा भारतातून निःपात करणे अशक्य, केरळी आर्चबिशप (Christianity cannot be wiped out of India, says Archbishop Cleemis Archbishop and Kerala Catholic Bishop Council president Cardinal Mar Baselios Cleemis slammed the Centre for not being able to restore peace in violence-hit Manipur).’
उ. ‘मॅटर्स इंडिया’च्या संकेतस्थळावर ‘मणीपूर हिंसाचार ख्रिस्त्यांच्या उच्चाटनासाठी (Manipur violence aims at eliminating Christians, say MP).’
ऊ. ‘ख्रिश्चॅनिटी टुडे’च्या संकेतस्थळावर ‘मणीपूर हिंसाचाराने आम्ही हादरलो आहोत. (‘The Violence Has Shattered Us’ Many from India’s tribal Kuki community have fled their homes. Amid ongoing violence, returning isn’t an option).’
हिंदु, भाजप, भारत यांची अपकीर्ती कशा प्रकारे केली जाते, त्याची ही झाली काही उदाहरणे ! यावरून लक्षात येते की, मणीपूरमधील दुर्दैवी हिंसाचार पीडित आणि त्यांची दुःखे राहिली एका बाजूला अन् त्याचा वापर करून देशात आणि जगभरात हिंदू, तसेच भारताविरुद्ध चर्च अन् साम्यवादी यांची घाणेरडी मानसिकता एका बाजूला.
युरोपियन संसदेत मणीपूर हिंसेवर चर्चा करण्यामागे आणि प्रस्ताव आणण्यामागे ‘भारतविरोधी प्रचार आणि त्याद्वारे विषय सर्वदूर पसरवून पीडित ख्रिस्त्यांच्या नावाने अफाट पैसा कमावणे’, हा प्रमुख उद्देश आहे.
४. साम्यवादी आणि चर्चचे समान चरित्र – हिंसेच्या माध्यमातून सत्ता अन् प्रसार
युरोपियन ख्रिस्ती पहिल्यांदा अमेरिकेत गेले, तेव्हा त्यांनी ‘रेड इंडियन’ समाजाचा ज्या क्रूरपद्धतीने नायनाट केला त्याला तोड नाही ! तीच पद्धत साम्यवादी शासनकर्ते चीन, रशियात वापरत आले आहेत आणि तोच प्रकार भारतीय साम्यवाद्यांनी बंगाल, केरळ येथे वापरला आहे.
४ अ. साम्यवाद्यांनी केलेले मारीचझापी (सुंदरबन, बंगाल) येथील हिंदु दलित हत्याकांड : वर्ष १९७९ मध्ये सहस्रो विस्थापित नामशूद्र हिंदु दलित बंगालच्या सुंदरबन भागातील मारीचझापीच्या बेटांवर येऊन राहू लागले. ज्योती बसूंच्या तत्कालीन साम्यवादी सरकारने त्यांच्यावर पोलीस अत्याचार करून ५ सहस्र नामशूद्र हिंदु दलितांना ठार मारून त्यांची प्रेते नदीत फेकून दिली. एकूण १४ सहस्र ३८८ दलित परिवार तिथे आले होते, यांपैकी हत्याकांडाने घाबरलेले १० सहस्र २६० परिवार पळून गेले आणि ४ सहस्र १२८ परिवार गायब झाले. याचा अर्थ एकूण मृत व्यक्तींच्या मृत्यूचा आकडा ५ सहस्र नसून तो त्याच्या कित्येक पट अधिक होता. या भीषण हत्याकांडावर दीप हलदर यांचे ‘ब्लड आयलंड’ नावाचे पुस्तक आहे. त्याही पुढे जाऊन ज्योती बसूंनी हे ‘सीआयए’चे (अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचे) षड्यंत्र’ असल्याचे घोषित केले !
चर्चने इतिहासात केलेल्या हत्याकांडाची सूची न संपणारी आहे. गोव्याच्या अमानवीय ‘गोवन इन्क्विझिशन’विषयी (धर्मच्छळाविषयी) आपल्याला ठाऊक आहेच; पण ख्रिस्ती अत्याचारांपैकी व्यभिचाराच्या नावाखाली लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचार करून जन्मभर कारागृहात डांबलेल्या आयर्लंडच्या ‘माग्दालिन लाऊंड्रिज’ सगळ्यात कुप्रसिद्ध आहेत. यात सहस्रो मुली, महिला या कॅथॉलिक पाद्री, बिशपच्या वासनेच्या शिकार झाल्या. त्यांचे गर्भपात करून शेकडो अर्भके तिथेच गाडली गेली, वेड्या, भ्रमिष्ट झालेल्या अत्याचारित महिला सडून सडून मेल्या ! याविषयी पोपना त्यांच्या दौर्याच्या वेळी नाक घासावे लागले होते.
५. साम्यवादी अन् चर्च यांनी हिंदूंच्या विरोधात हिंसेचे आरोप करण्यामागील षड्यंत्र
‘स्वतःचा इतिहास क्रूर आणि रक्तरंजित आहे’, हे ठाऊक असल्यानेच साम्यवादी अन् चर्च प्रत्येक वेळी हिंदूंच्या विरोधात हिंसेचे आरोप करतात. ‘संघटना हिंसेविना वाढूच शकत नाही’, या धारणेपायी एक साम्यवादी माजी खासदार महिला नेत्रीने मणीपूरमधील एका भाजप नेत्याचा संघ गणवेशातील छायाचित्र प्रसारित करून संघ आणि नग्न धिंड, बलात्कारी यांचा संबंध जुळवण्याचा प्रयत्न केला. चर्च आणि साम्यवादी हे पराकोटीचे हिंसक अन् विकृत आहेत. त्यांचे हात कोट्यवधींच्या रक्ताने बरबटलेले आहेत. त्यावर पांघरूण घालून दुसर्याला हिंसक ठरवणे, याला आपण काय म्हणाल ? या जोडीच्या खोट्या आणि विषारी प्रचारापासून आपण कायम सावध राहिले पाहिजे.
– श्री. विनय जोशी, सामरिक शास्त्र विश्लेषक
(श्री. विनय जोशी यांच्या फेसबूकवरून हा लेख घेतला असून त्यासाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह त्यांचा आभारी आहे. – संपादक)