शिक्षणक्षेत्राला कलंक असलेले वासनांध शिक्षक !

पुणे – लग्नाचे आमीष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी बाळासाहेब बांगर या शिक्षकाला ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, तसेच फसवणूक केली म्हणून ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पोलिसांनी बांगर याच्यावर बलात्काराचा, फसवणुकीचा, तसेच धमकीचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.
पीडिता वर्ष २००६ मध्ये सांगली येथे डी.एड्.चे शिक्षण घेत होती. तेव्हा ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तेव्हापासून वर्ष २०१२ पर्यंत आरोपी लग्नाचे आमीष दाखवून पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. आरोपीने पीडितेला ‘५ लाख रुपये दे, अन्यथा छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करीन’, अशी धमकी देऊन मारहाणही करत होता. शेवटी या त्रासाला कंटाळून वर्ष २०१२ मध्ये खेड पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार प्रविष्ट केली होती.
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
माळेगाव मक्ता (नांदेड) येथे वादळी वार्यामुळे १५ ते २० लाख रुपयांची हानी !
आषाढी वारीच्या मार्गात प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध !