सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा सत्‍संग लाभल्‍यामुळे साधकाला आलेल्‍या अनुभूती

‘ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये कर्णावती (गुजरात) येथे एका सत्‍संगात ‘साधना चांगल्‍या प्रकारे कशी करूशकतो ?’, यावर मार्गदर्शन करण्‍यात आले. या वेळी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा सत्‍संग लाभल्‍यामुळे श्री. श्रवण पंचाल यांना आलेल्‍या अनुभूती येथे देत आहोत.

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

१. संतांनी ‘तुमच्‍या घरात पुष्‍कळ चैतन्‍य असल्‍यामुळे पुढील वेळी तुमच्‍याच घरी निवास करू’, असे सांगणे

या शिबिराच्‍या निमित्ताने मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात राज्‍य येथील धर्मप्रसारक सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत) आणि सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस (आताची आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) हे आमच्‍या घरी १० दिवस निवासाला होते. त्‍यांनी मला सांगितले, ‘‘मागील काही वर्षांपासून आम्‍ही बाहेर कुठेही एवढे दिवस राहिलो नाही. तुमच्‍या घरी पुष्‍कळ चैतन्‍य आहे. आम्‍ही पुन्‍हा इकडे येऊ, तेव्‍हा तुमच्‍याच घरी निवास करू.’’

पू. (सौ.) संगीता जाधव

२. कुलदेवी ‘श्री चामुंडादेवी’कडे पाहून संतांचा भाव जागृत होणे आणि त्‍यांनी सूक्ष्मातून देवीशी बोलणे

मागील ३२ वर्षांपासून आमच्‍या घरात आमची कुलदेवी ‘श्री चामुंडादेवी’ची प्राणप्रतिष्‍ठा केलेली मूर्ती आहे. आम्‍ही प्रतिदिन सकाळ-सायंकाळ तिची सेवा, पूजा आणि आरती करतो. देवघरातील ‘श्री चामुंडादेवी’चे दर्शन घेतांना सद़्‍गुरु अनुराधाताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू यांचा भाव जागृत झाला. त्‍या देवीशी सूक्ष्मातून बोलल्‍या. तेव्‍हा देवी त्‍यांना म्‍हणाली, ‘मी अधिक वेळ रामनाथीमध्‍येच (गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात) निवास करते आणि तेथील सर्व साधकांचे रक्षण करते.’

३. सद़्‍गुरु अनुराधाताई आणि पू. (सौ.) जाधवकाकूू आमच्‍या घरातून परत जायला निघाल्‍या, तेव्‍हा मला वातावरणात मोठ्या प्रमाणात चंदनाचा सुगंध आला.

४. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍या  सत्‍संगामुळे साधकाच्‍या जीवनात पालट होऊन चौघेही कुटुंबीय साधना करू लागणे

सद़्‍गुरु अनुराधातार्ईंच्‍या या दौर्‍यामुळे आमच्‍या जीवनात पालट झाला असून आता आम्‍ही कुटुंबातील चौघेही जण साधना करत आहोत. त्‍यातून आम्‍हाला पुष्‍कळ आनंद मिळतो. आम्‍ही एकमेकांच्‍या साहाय्‍यानेे स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाचे प्रयत्नही करू शकत आहोत.

५. कृतज्ञता

हे सर्व गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) कृपेमुळेच झाले आहे. ‘हे गुरुदेवा, आपली अशीच कृपा आम्‍हा सर्वांवर सदैव राहू द्यावी’, अशी आपल्‍या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. श्रवण पंचाल, कर्णावती, गुजरात. (१४.१०.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक