‘सद़्गुरु ताई,
आज म्हणजे १९.३.२०२३ या दिवशी तुमच्या (सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या) ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवाने मला तुमच्याविषयी फार वेगळे काही सांगितले. ते तुमच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.’
आमच एवढं भाग्य नाही की, परम पूज्य गुरुदेवांचा प्रत्यक्ष सहवास आम्हाला मिळावा ।
केवळ दैनिकात आणि ग्रंथांत वाचून त्यांचे दिव्यत्व आम्ही अल्प मती जीव कसे जाणणार ॥ १॥
परम पूज्य गुरुदेवांची प्रीती, त्यांची तळमळ, त्यांचे सामर्थ्य आम्हाला कसे कळणार ।
म्हणूनच आमच्यासाठी परम पूज्य गुरुदेव तुमच्या रूपात साकार झाले ॥ २ ॥
तुमच्या वात्सल्यात आम्ही त्यांची प्रीती अनुभवू शकतो ।
साधकांना घडवण्याच्या तुमच्या अविरत प्रयत्नांमध्ये आम्ही त्यांची तळमळ अनुभवू शकतो ॥ ३ ॥
तुमचा गुरु आज्ञापालनाचा संघर्ष पाहून आम्हाला साधनेचा अर्थ उमगतो ।
तुमचा त्याग आमच्यात मायेच्या बंधनातून मुक्त होण्याची ओढ जागवतो ॥ ४ ॥
तुमचा साधनेचा प्रवास आमच्यात गुरुकृपेची आस निर्माण करतो ।
तुमच्या रूपात आम्ही प्रत्यक्ष श्रीगुरूंना अनुभवत असतो ॥ ५ ॥
अन्यथा आम्ही अबोध अज्ञानी जीव गुरुकृपेपासून वंचितच राहिलो असतो ।
परम पूज्य गुरुदेवांची आमच्यावरची पुष्कळ मोठी कृपा म्हणजे तुम्ही आम्हाला लाभणे ॥ ६ ॥
तुमच्या आणि श्रीगुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ……
– श्री. ओंकार कानडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.३.२०२३)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |