पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !
कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतामध्ये ३ हिंदु बहिणींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आल्यानंतर त्यांचा मुसलमानांशी विवाह करवून देण्यात आला. अल्पसंख्यांकांच्या एका संघटनेने ही माहिती दिली. या तरुणी हिंदु व्यावसायिक लीला राम यांच्या मुली आहेत. चांदनी, रोशनी आणि परमेश कुमारी अशी त्यांची नावे आहेत. जावेद अहमद कादरी याच्या माध्यमांतून या तिघांचे धर्मांतर करण्यात आले होते.
Seema Haider: हिंदुओं पर अत्याचार बढ़ा! जबरन करवाया गया 3 बहनों का धर्म परिवर्तन, किडनैपर्स से करा दी गई शादी
https://t.co/ndCWGytjNj— Jansatta (@Jansatta) July 21, 2023
अल्पसंख्यांक संघटनेचे प्रमुख शिवा काछी यांनी सांगितले की, या प्रकरणी आमच्या संघटनेने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. पोलीस अद्यापही आरोपींना पकडू शकलेले नाहीत. सीमा हैदर प्रकरणानंतर येथील हिंदूंवरील आघातांच्या घटनांत वाढ झाली आहे.

४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार