पाकमधील दरोडेखोरांच्या टोळीची भारताला धमकी !

नवी देहली – पाकिस्तानमधून सीमा हैदर नावाची विवाहित मुसलमान महिला तिच्या ४ मुलांना घेऊन भारतात तिच्या प्रियकराकडे आली आहे. सीमा हिने हिंदु धर्म स्वीकारला आहे. पोलिसांकडून सीमा, तिचा प्रियकर सचिन यांना अटकही करण्यात आली होती. सध्या त्यांना जामीन मिळाला आहे. आता पाकच्या बलुचिस्तानमधील झकरानी समूहाच्या दरोडेखोरांच्या एका गटाने भारताला धमकी दिली आहे. ‘जर सीमा हैदरला परत पाकिस्तानमध्ये पाठवले नाही, तर पाकमधील हिंदु महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली जाईल’, असे त्यांनी धमकावले आहे. धमकी देणार्या गटाचा प्रमुख येथील कुप्रसिद्ध दरोडेखोर रानो शार आहे.
सीमा हैदर नहीं आई तो हिंदू महिलाओं से करेंगे बलात्कार: पाकिस्तान से आया धमकी वाला Video, कहा- इज्जत प्यारी है तो हमारी लड़की वापस भेजो#SeemaHaider #Pakistan https://t.co/JqJgj4RzME
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 11, 2023
संपादकीय भूमिकापाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून म्हणजे वर्ष १९४७ पासून तेथे हिंदूंवर अत्याचार चालूच आहेत. त्यात वेगळे काही नाही. सीमा हैदर परत पाकमध्ये गेली, तर अशा प्रकारची धमकी देणारे गांधीवादी आचरण करतील, याची अपेक्षा करता येत नाही ! |
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण
भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !