नाशिक येथील श्री विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त रवींद्र पाटील यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी गौरवोद़्गार !

नाशिक येथील विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. रवींद्र पाटील यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या आयोजनात सहभागी झालेल्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी गौरवोद़्गार काढले. महोत्सवाच्या व्यासपिठावरून मनोगत व्यक्त करतांना श्री. रवींद्र पाटील म्हणाले, ‘‘येथे हिंदुत्वाच्या अधिवेशनाऐवजी संत आणि महापुरुष यांच्यामध्ये असल्याप्रमाणे मला वाटत आहे. येथे सेवा करणार्या सर्वांच्या मुखावर किती तेज आहे ! सर्वांच्या वागण्यात किती नम्रता आहे ! सर्वांचा चेहरा सात्त्विक असून कुणाच्या चेहर्यावर अहंकार नाही. येथील वातावरण अतिशय चांगले आहे. येथे उपस्थित असलेल्या सनातनच्या साधिकांशी बोलतांना श्री भगवतीदेवीच आपल्याशी बोलण्यासाठी आल्यासारखे वाटते.’’
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !